HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डीकेटीईत फॅशन फयुजन फॅशन शो उत्साहात संपन्न

डीकेटीईत फॅशन फयुजन फॅशन शो उत्साहात संपन्न

इचलकरंजी प्रतिनिधी :  येथील डीकेटीई इन्स्टिटयूट मध्ये झालेल्या ‘फॅशन फयुजन’ फॅशन शो च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कौशल्यपूर्ण सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. डीकेटीईमध्ये दरवर्षी होणारा फॅशन शो हा आकर्षणाचा भाग असतो. विद्यार्थी कल्पकतेतून वेगवेगळया संकल्पना या कार्यक्रमात साकारतात. कार्यक्रमात सहभागी झालेल्या संघानी ट्रॅडीशनल, फॉर्मल व कॅज्युअल अशा फे-यांमधून प्रत्येक वेळी वेगवेगळी संकल्पना घेवून विविध फॅशन वस्त्रप्रावरणे सादरीकरण केले. विविधांगी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यानी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

संगीत व आकर्षक प्रकाशझोताच्या तालावर सादर केलेल्या संकल्पना विविध विषयावर प्रकाशझोत टाकणा-या होत्या. या स्पर्धेत स्टाईल सेन्सेशन व इक्लिप्स या ग्रुपनी सहभाग घेतला होता. स्टाईल सेन्सेशन यांनी नेत्रदीपक पारंपारिक पोशाख परिधान करुन प्रेक्षकांना मोहित केले, संस्कृतीला अभिजातता आणि मोहकतेसह सादरीकरण केले. तर इक्लिप्स यांनी एक अद्वितीय आणि आकर्षक गॉथिक थीम सादर केली, ज्यामुळे रॅम्पवॉकला गूढ आणि नाटयमय स्पर्श मिळाला.

सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांचे मागदर्शन लाभले. संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, सोशल डीन प्रा.एस.जी. कानिटकर, सोशल प्रमुुख प्रा.ए.व्ही. शहा, डॉ. ए.आर. बलवान व प्रा.ए.यु. अवसरे यांच्या हस्ते फॅशन शो चे उदघाटन झाले. डॉ.व्ही.के.ढंगे व सहकारी यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.