उंचगाव येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप...

उंचगाव येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप...

कोल्हापूर (प्रतिनिधी) - सत्यम फाउंडेशन व शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उंचगाव येथील कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास पेटी, पेनसह इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी १७ विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या संस्कारावरच पुढील कार्य चालू राहील.

यावेळी बोलताना सत्यम फाउंडेशनचे प्रतीक शिंदे म्हणाले की, फाउंडेशन च्या वतीने यापुढेही समाजातील गरजू घटकांना मदत करून त्यांना आधार देण्याचे काम करू.

दीपक रेडेकर यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

यावेळी सत्यम फाउंडेशनचे प्रतीक शिंदे, शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगाव प्रमुख दीपक रेडेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख सुनील चौगुले, युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार, शाळा व्यवस्थापन समितीचे संजय चौगुले,संदीप वळकुंजे, विभाग प्रमुख अक्षय परीट, अजित चव्हाण, आबा जाधव, रामराव पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय लोंढे सर, नारायण बेळणेकर सर व सर्व सहाय्यक शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.