शिरोली औद्योगिक क्षेत्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रम

शिरोली औद्योगिक क्षेत्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रम

टोप (प्रतिनिधी) - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी व शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मॅक यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोली औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता, वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृतीसारखे उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.

यावर्षीच्या उपक्रमांची सुरुवात बी. जी. खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या जनजागृती फेरीने करण्यात झाली. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन पर्यावरण रक्षणाचे संदेश दिले. स्वच्छता मोहिम श्रीराम फाउंड्री चौक, प्रियदर्शनी पॉली सॅक्स, शिरोली पोलीस ठाणे, कॅस्प्रो चौक, एस. बी. रिशेलर्स, पहिला फाटा, सकाळ प्रेस अशा प्रमुख ठिकाणी राबविण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एमपीसीबी यांच्यातर्फे 'प्लास्टिकला नाही म्हणा' या संदेशाचे हेडबँड्स विशेष आकर्षण ठरले.  

या कार्यक्रमाला प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक, उप अभियंता अजयकुमार रानगे, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक जे. ए. वावरे, एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी निखिल धरत, क्षेत्र अधिकारी डॉ. रोहिदास मातकर, अंकुश पाटील, विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, स्मॅक चेअरमन राजू पाटील, व्हाईस चेअरमन भरत जाधव, ऑ. सेक्रेटरी शेखर कुसाळे, खजिनदार बदाम पाटील, जयदत्त जोशीलकर,दत्ता सावंत , संजय जाधव, विविध उद्योजक, एचआर, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.