शेंडापार्कमध्ये होणार सर्व सोयीसुविधांयुक्त 1100 बेड्सचे हॉस्पिटल

शेंडापार्कमध्ये होणार सर्व सोयीसुविधांयुक्त 1100 बेड्सचे हॉस्पिटल

वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडचे सर्व सोयी आणि सेवासुविधांयुक्त अद्ययावत हॉस्पिटल होणार अशी घोषणा केली असून ३० एकर जागेत होणाऱ्या या हॉस्पिटलसाठी ४५१ कोटींच्या स्वतंत्र प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालसाठी शेंडा पार्क येथे 30 एकर जागा राखीव असून या जागेत 1100 बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. हे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच शासकीय वैद्यकीय हास्पिटलचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

या खेरीज सात मोड्युलर ऑपरेशन थिएटर, सीएसएसडी, इमारतींची आणि अंतर्गत रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती यांच्या निधीसाठीही ७३ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये प्रशस्त ऑडीटोरियम, वैद्यकशास्त्राची स्वतंत्र इमारत, सामान्य रुग्णालय, कॅन्सर साठी 250 बेड्स सह सुपर स्पेसिऍलिटी बेड्स, शवविच्छेदन गृह, पुरुष व महिलांकारिता सुसज्ज हॉस्टेल , विद्यार्थी वसतिगृह, परीक्षा भवन, लायब्ररी तसेच परिचारिककांसाठी प्रशिक्षण विभाग असणार आहे. महाविद्यालयातील शवविच्छेदन गृह, विद्यार्थिनी वसतिगृह,परीक्षा भवन, ग्रंथालय, ऑडिटोरियम हॉल या पाच इमारतींचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री शहा यांचे हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले.