केआयटीत मेरीट 'स्कॉलरशिप' चे वितरण ; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

केआयटीत मेरीट 'स्कॉलरशिप' चे वितरण ; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

कोल्हापूर :  केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (प्रदत्त स्वायत्त) तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप योजनेअंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात १८  विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. सी.ई.टी.  २०२४  स्कोअर, मागील वर्षातील शैक्षणिक कामगिरी आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या आधारे निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ११  मुले आणि ८ मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही विद्यार्थ्यांनी सी.ई.टी.२०२४ मध्ये ९९.५० पर्सेंटाइलपर्यंत उच्च कामगिरी करून स्कॉलरशिप मिळवली आहे.

ही योजना केआयटीने गेल्या वर्षी सुरू केली होती. त्या वेळी सहा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली होती. यंदा हा आकडा वाढून १८ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी लाभार्थी ठरलेल्या तीन विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षीसुद्धा स्कॉलरशिप देण्यात आली आहे. या स्कॉलरशिप मुळे अनेक विद्यार्थ्यांना भरीव प्रमाणात शैक्षणिक शुल्कात सूट देण्यात आलेली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या वरील शैक्षणिक शुल्काचा भार कमी झालेला आहे. अशा प्रकारच्या मेरीट स्कॉलरशिप देण्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात ओढा केआयटीकडे या २४ -२५ च्या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळी दिसून आला. 

स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये प्रथम वर्षातील सूर्यकांत शिंदे, श्रीनिवास कुलकर्णी, वैदेही राठोड, रितिका पाटील, सुयश पाटील, कृष्णा अडागळे, सोनिया एरांडे, अर्थव पाटील, दर्शन गोरी, अनिकेत गवळी, दर्शन पाटील, माही चाटे, यश बंने, वैभव भोसले आणि आदित्य जाधव यांचा समावेश आहे. तसेच दुसऱ्या वर्षासाठी वेणू पाटील, आशिया तांबोळी आणि मृणाली भोसले यांची निवड झाली आहे.

संस्थेचे अध्यक्ष  साजिद हुदली, उपाध्यक्ष  सचिन मेनन, सचिव  दीपक चौगुले, विश्वस्त दिलीप जोशी आणि  सुनील कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. संचालक डॉ. मोहन वनरोट्टी आणि रजिस्ट्रार डॉ. दत्तात्रय साठे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. डॉ. महेश शिंदे आणि प्रा. अमर टिकोळे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडली. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी केआयटी सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.