शिवाजी विद्यापीठामध्ये उद्या व्याख्यानासह शाहिरी पोवाडा, मर्दानी खेळाचे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी - शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी व संशोधक विद्यार्थी आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीनेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानासह पोवाडा आणि मर्दानी खेळांचेही आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये 'शिवजन्मोत्सव सोहळा 2025' अंतर्गत मंगळवार, दि.18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता 'कणखर नेतृत्वासाठी शिवनीती' या विषयावर शिवचरित्र अभ्यासक राहूल नलावडे (रायबा) यांचे प्रबोधनपर उद्बोधक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये सायंकाळी पाच वाजता युवाशाहिर डॉ.अमोल रणदिवे यांच्या 'शाहिरी पोवाडयाचा कार्यक्रम', मर्दानी खेळाचे सादरीकरण महाराष्ट्र संस्कृती शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे. त्याच बरोबर, बुधवार, दि.१९ फेब्रुवारी सकाळी ७.३० वाजता मर्दानी खेळ, शिवरायांच्या प्रतिमेला मानवंदना कार्यक्रम तर सायंकाळी ७.०० वाजता दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के भूषविणार आहेत.
याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कुलसचिव डॉ.विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.महादेव देशमुख, डॉ.सरिता ठकार, डॉ.एम.व्ही.गुळवणी यांचेसह विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तुकाराम चौगुले, मुलांच्या वसतिगृहाचे मुख्य अधिक्षक डॉ.प्रल्हाद माने, मुलींच्या वसतिगृहाच्या मुख्य अधिक्षक डॉ.माधुरी वाळवेकर, कमवा व शिका वसतिगृहाचे मुख्य अधिक्षक डॉ.दिपक भादले हे उपस्थित राहणार आहेत.