कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा
कोल्हापूर : यशवंत चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून जिल्ह्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचा मध्य प्रदेशमधील इंदोर येथे अभ्यास दौरा झाला. या अभ्यास दौ-यामध्ये इंदोर महापालिका व देव गोरडिया, तिल्लोरखुर्द, डेंडिया, बांक, कल्लिबिलोद, सिंहासिया-कलारिया या ग्रामपंचायतीने घनकचरा विल्हेवाट, सोलर सिस्टिम, बचत गट अंतर्गत केलेले काम पाहून जिल्ह्यातील सरपंच प्रेरित झाले आहेत.
पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता माधुरी परीट, पंचायत समिती कागलचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, विस्तार अधिकारी (पंचायत) नारायण राम्मणा, ग्रामपंचायत कौलगे ता.गडहिंग्लजचे सरंपच भाउ धोंडीबा कांबळे, ग्रामपंचायत पिंपळगाव बुद्रूक ता.कागलचे सरपंच बंडेराव सुर्यवंशी, ग्रामपंचायत कसबा तारळे, ता.राधानगरी सरंपच विमल रविंद्र पाटील, ग्रामपंचायत निगवे दुमाला, ता.करवीर सरंपच रुपाली अर्जुन पाटील, ग्रामपंचायत पुलाची शिरोली, ता.हातकणंगले सरंपच पदमजा कृश्नात करपे, ग्रामपंचायत सरोळी, ता.आजरा सरंपच प्रज्ञा प्रविण पाटील, ग्रामपंचायत जांबरे, ता.चंदगड सरंपच विश्नु विश्राम गावडे, ग्रामपंचायत पुलाची शिरोली, ता.हातकणंगले , ग्राम विकास अधिकारी आंनदा यशवंत कदम, ग्राम विकास अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर सचिन शिरदवाडे, ग्रामपंचायत निगवे दुमाला, ता.करवीर ग्रामविकास अधिकारी संजय शिंदे हे या इंदोर अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते.
या अभ्यास दौ-यात जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता माधुरी परीट म्हणाल्या की, शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या या अभ्यास दौ-यात इंदोर जिल्हयातील ग्रामपंचायतींनी कचरा विलगीकरणाचे काम चांगल्या प्रकारे केले आहे. प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र ग्रामपंचायतीं मार्फत चालवले जात आहेत तसेच स्वच्छता कराची आकारणी करुन, ग्रामपंचायतींनी बचत गटांच्या महिला व सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेतले आहे. इंदोर भागातील ग्रामपंचायतींनी केलेले काम निश्चित प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणारे आहेत. या कामाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न सहभागी झालेल्या सरपंच, ग्रामपंचायतीने करावे.