शुल्क नियंत्रण कायदा महाराष्ट्रात अंमलात आणा : रुग्ण हक्क संघर्ष समिती

पुणे - आज रुग्ण हक्क संघर्ष समिती संस्थापक प्रमुख ॲड. विजयभाऊ पंडित यांना पुणे येथील डॉ. तोडकर हाॅस्पिटल मधून मयताचे नातेवाईक किशोर कमाने यांचा फोन आला व मयत व त्यांच्या कुटुंब गरीब असून मागील अनेक महिन्यांपासून घरातील कर्ता आजारी असल्याने खूप खर्च झाला व परिस्थिती नाजूक आहे. त्यांना मदत हवी आहे तोडकर हाॅस्पिटल यांनी तब्बल ४ तासापासून बिलापोटी डेडबाॅडी अडवून ठेवली आहे देत नाहीत मदत हवी आहे म्हणून तेव्हा तेथे माहिती घेतली असता, डॉ. तोडकर हाॅस्पिटल मध्ये अनिल उपचार घेत होते पण आज त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते. यावेळी शुल्क नियंत्रण कायदा अंमलात आणा अशी मागणी रुग्ण हक्क संघर्ष समिती यांच्याकडून करण्यात आली.
संबंधित हाॅस्पिटल मध्ये वेळोवेळी त्यांच्या नातेवाईकांनी ॲडव्हान्स बिल भरुनही आज शिल्लक बिल तोंडी १,४०,०००/- सांगण्यात आले आणि दिलेले बील १०५००० चे होते यात तफावत का केली आपण व बिलापोटी आपण बाॅडी का अडवून ठेवली यासाठी रुग्ण हक्क संघर्ष समिती पुणे शहराध्यक्ष संजय बावळेकर व अश्रू खवळे यांनी संबंधित हाॅस्पिटल प्रशासनाला जाब विचारला व संबंधित डॉक्टर यांनाही याविषयी जाब विचारला असता त्यांनी तब्बल १,४५,००० एवढे बिल कमी करुन डेडबाॅडी पुढे शवविच्छेदनासाठी ससूनकडे पाठवून दिले. अशा अनेक घटना महाराष्ट्रात खाजगी हाॅस्पिटल मध्ये घडतात अशा बिकट दुखःच्या वेळी ही या स्वयं घोषित देवदुताना दया येत नाही त्यांना पैशाच्या पुढे माणूसकी दिसत नाही. अशा अनेक तक्रारी दर दिवस येत राहतात रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र कडे तक्रार येताच पदाधिकारी धाव घेऊन तेथील झालेली लूट थांबविण्यासाठी सक्षम कार्य करतात.
यावेळी मयत अनिल कुकडे यांच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे आभार मानले. यावेळी रुग्ण हक्क संघर्ष समिती चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. हाॅस्पिटल प्रशासनाने दाखवलेलं सामंजस्य व सहकार्य बद्दल रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र च्या वतीने हाॅस्पिटलचे आभार मानले.