HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

सावंतवाडी नगरपालिका महिला कर्मचारी व महिला सफाई कर्मचारी भगिनी यांचा जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात आला जाहीर सत्कार.

सावंतवाडी  नगरपालिका महिला कर्मचारी व महिला सफाई कर्मचारी भगिनी यांचा जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात आला जाहीर सत्कार.

अमित वेंगुर्लेकर

जागतिक महिला दिनानिमित्त सावंवाडीतील नगरपालिका महिला कर्मचारी व महिला सफाई कामगार भगिनी यांचा सत्कार सोहळा मानवाधिकार न्याय सुरक्षा संघठन सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांच्या माध्यमातून मुख्याधिकारी माननीय श्री.जयंतजी जावडेकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

 सावंवाडी शहवासीयांना नियोजनपूर्वक सेवा सहकार्य देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असलेल्या नगरपालिका महिला कर्मचारी व सफाई कामगार भगिनी यांचे समाज उपयोगी कार्य हे सावंवाडीतील जनतेला अतिशय प्रेरणादायक ठरत आहे.शहरामध्ये जनजागृती करणे,शहरवासीयांचे तसेच संगणीकृत कागदपत्रांचे काम, बाजार मंडई मधील स्वच्छता अभियान अशा अनेक योजना राबविण्यात सदर महिला कर्मचारी भगिनी नेहमीच आपलं कार्य पूर्ण जबाबदारीने पार पाडत आहेत.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन भारत सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सोळा महिला कर्मचारी व चार सफाई कामगार भगिनी यांचा सत्कार महिला जिल्हाध्यक्ष सौ. नीलम गवस, जरीना शेख,सानिया शेख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व गुलाब पुष्प देवून गौरविण्यात आले, यावेळी मुख्याधिकरी माननीय श्री. जयंतजी जावडेकर यांनी आपले विचार मांडले.नगरपालिका महिला कर्मचारी सौ.परवीन शेख मॅडम यांनीही महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन सिंधुदुर्ग जिल्हा महिलाध्यक्ष सौ.नीलम गवस यांनीही जागतिक महिला दिनानिमित्त महिला कर्मचारी भगिनी यांना महिलांचे हकक व समाजातील उद्भवणाऱ्या समस्या याबाबत मार्गदर्शन केले.प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर यांनी महिला सफाई कामगार भगिनी यांना एका वर्षाची आरोग्य सेवा विमा पॉलिसी मानवाधिकार संघटनेमार्फत देणार असल्याचे यावेळी जाहीर केले, सदर सत्कार सोहळा प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी तर्फे जिल्हाध्यक्ष श्री रिजवान बाडीवाले, युवक जिल्हाध्यक्ष श्री. संजय गावडे, वरिष्ठ जिल्हाध्यक्ष श्री. संतोष तळवणेकर,उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर पारधी,सरचिटणीस श्री. रमीझ मुल्ला, मीडिया प्रमुख श्री. आबिद कित्तुर्, तालुका प्रमुख श्री.अनंत सोंसुरकर, उपतालुका प्रमुख श्री.शाहबाझ शेख,प्रदेश सचिव श्री. अमित वेंगुर्लेकर,महिला जिल्हाध्यक्ष सौ.नीलम गवस, उपजिल्हाध्यक्ष सौ.सानिया शेख,सरचिटणीस सौ जरीना  शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.