सुधाकरनगर येथील अभियांत्रिकी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची आत्महत्या.

सुधाकरनगर येथील अभियांत्रिकी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची आत्महत्या.

कोल्हापुर, सुधाकरनगर येथील अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने फरशी कापण्याच्या ग्राईंड मशीनच्या साहाय्यानं गळा कापून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. काल रात्री साडे आठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना समोर आली. नीरज विकास सरगडे (वय २३,) असं त्या विद्यार्थ्याचं नाव असून नीरज आईसह आपल्या आजोळी सुधाकरनगर इथल्या बागेश्री अपार्टमेंटमध्ये राहत होता.अभियांत्रिकी डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात तो शिक्षण घेत होता. अर्थिक समस्येमुळे शिक्षणासाठी, लग्नासाठी लागणारी रक्कम, मुलाबाळांचा खर्च अशा भविष्यातील खर्चाची तरतूद आपण करू शकणार नाही, या चिंतेनं तो ग्रासला होता. आर्थिक परिस्थितीमुळे भविष्यातील निर्माण होणाऱ्या चिंतेमुळं त्याने आत्महत्या केल्याचे चिठीत लिहिले. 

       मिळालेल्या माहितीनुसार दुपारी तो कॉलेजवरून घरी आला आणि दार लावून घेऊन फरशी कापण्याच्या ग्राईंडर मशीनच्या साहाय्यानं त्यानं स्वतःचा गळा कापून घेतला. आत्महत्येनंतर बाजूला पडलेल्या ग्राईंडर मशीनच्या आवाजाने अपार्टमेंटमधील रहिवाशांनी फ्लॅटकडे धाव घेतली. यावेळी फ्लॅट बंद अवस्थेत आढळला. त्यानंतर हाका मारूनही कोणी प्रतिसाद देत नसल्याने रहिवाशांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मागच्या बाजूने जाऊन घरात प्रवेश केला असता नीरज बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. मृतदेहा बाजूला पडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण नमूद केले होत.