स्थानिक गुन्हे शाखेने १ कोटी ७८ लाख रूपयांची चोरी पकडली ; पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

स्थानिक गुन्हे शाखेने १ कोटी ७८ लाख रूपयांची चोरी पकडली ; पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - गांधीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात १ कोटी ७८ लाख रुपये रक्कम परत मिळवण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाल्याने पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पथकाचा रोख रक्कम १,००,००० रुपये देऊन त्यांचा सत्कार केला. 

गांधीनगरमधील व्यापारदार कैलास वसंत गोरड यांच्या कंपाउंडमध्ये पार्क केलेल्या टेम्पोची 13 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काच फोडून डॅशबोर्ड मधील रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. या घटनेची फिर्याद गोरड यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. गोरड यांच्या मित्राची देखील एक कोटी 90 लाख रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती गोरड यांनी दिली. 

दाखल केलेल्या फिर्यादीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला असता पथकाला माहिती मिळाली की, हा गुन्हा योगेश किरण पडळकर वय 30, सम्राट संजय शेळके वय 24 दोघेही राहणार लक्षतीर्थ वसाहत, स्वयंम सचिन सावंत वय 19 राहणार बुधवार पेठ, एक अल्पवयीन मुलगा यांनी मिळून केला आहे. पथकाने हॉकी स्टेडियम जवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चोरट्यांकडून 1 कोटी 78 लाख रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी आणि तीन मोबाईल हँडसेट असा एकूण 1 कोटी 79 लाख 5 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.