गार्डन्स क्लब व बोन्साय क्लब तर्फे नागरिकांना आवाहन

गार्डन्स क्लब व बोन्साय क्लब तर्फे नागरिकांना आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधि: आपल्या आसपास , इमारतीमध्ये, कुठल्याही बांधकामामध्ये झाड वाढलेले दिसल्यास, ते मुळांसह काढा व खाली दिलेल्या कोणत्याही पत्यावर 17 जुलै पूर्वी आणून द्या. 10 ते 17 जुलै हा झाडे वाचवा , इमारत वाचवा सप्ताह असणार आहे.

पावसाळा सुरु झाला कि कुठे कुठे पडलेल्या बिया, फांद्या रुजायला, फुलायला सुरुवात होते. पण ते इमारतीमध्ये, पाईप मध्ये, गटारीत, टेरेसवर, भिंतीच्या खाचेत रुजले तर इमारतीला धोका आणि झाडाचं आयुष्य पण वाया.

आपल्या नेहमीच्या दिनक्रमात, जाता, येता बरेचदा आपल्याला हि झाडं खुणावत असतात. असंख्य अशा या झाडांमध्ये , पिंपळ, उंबर , वड हि आपल्याला सगळ्यात जास्त आढळून येतील. त्यांना नुट्रीएंट्स न मिळाल्यामुळे ती थोडी खुजी असतात, उंचीला कमी आणि जाडी जास्त. पण अतिशय अवघड परिस्थितीत वाढल्यामुळे ताकदीची असतात, सशक्त असतात. आणि वाण हि, उत्कृष्ट, देशी !! अशी हि जाड खोडाची झाडं आपण जगवू शकलो तर इमारत , झाड आणि आपण या सगळ्यांचा धोका कमी होईल. त्या झाडाचा जन्म सार्थकी लागेल. म्हणूनच कि काय त्याला बोन्साय च्या भाषेत '*यमादोरी* ' ( यमाच्या हातात ज्याची दोरी आहे असा शब्दोशब्दी अर्थ आपण लावू शकतो.! ) असे म्हणले जाते.

वनस्पतीशास्त्र तज्ञ् डॉ धनश्री पाटील यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे 

1. सर्वप्रथम झाड जिथून काढतोय त्या मालकांची परवानगी घ्या 

2. ⁠त्या नंतर, चिरा, वीट बांधकाम, दगडी बांधकाम यांचा सांधा खुरप्याच्या मदतीने थोडा सैल करून त्या झाडाची मुळे सुटी करून घ्या . भिंत खराब न होता आणि मुळे न तुटता ती जास्तीत जास्त येणे महत्वाचे.

3. ⁠भर वस्तीत किंवा वाहतुकीच्या जागी झाड काढत असताना शक्यतो सकाळी लवकर काढणे उत्तम अथवा वाहतूक थांबवून, मदतीला एक दोघांना घेऊन ते काढा.

4. ⁠पावसाळ्याच्या दिवसांत , भिंती निसरड्या झालेल्या असतात. उंचावरची झाडे काढताना सावधगिरी बाळगणे महत्वाचे.

5. रुटॉक्स किंवा जिब्रालिक ऍसिड मिसळलेल्या पाण्यामध्ये ते झाड 10-12 तास मुळे पाण्यात राहतील अशी ठेवा.

6. त्यानंतर योग्य आकाराचा पॉट घेऊन त्यामध्ये वीटा , वाळू याचे मिश्रण भरून , झाड लावताना खतमिश्रित माती वापरून , मुळे झाकली जातील एवढी कुंडी भरा .

6. ⁠झाड जगले आणि पालवी यायला लागली कि आपण ते कुठेही लावू शकतो. 

7. ⁠आपण झाड काढल्यावर त्याला या पद्धतीने जगवा अथवा जागा उपलब्ध नसल्यास खाली दिलेल्या शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे पत्ते व फोन नं शी संपर्क करा आणि तिथे ते झाड जमा करा. आम्ही ते नक्की जगवू .

जास्तीत जास्त झाडे आणणाऱ्यांना गार्डन्स क्लब तर्फे बक्षीस देऊन गौरविले जाईल.यासाठी मोफत मार्गदर्शन व सल्ला आपल्याला गार्डन्स क्लब कोल्हापूर कडून मिळेल.

Collection सेन्टर्स -

1. कावळा नाका -जगताप नर्सरी, 8956968780

2. ताराबाई पार्क- faces , सचिन बोनगाळे - 9890687171

3. राजारामपुरी - सुनीती देशमुख -9762315457