महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समितीचे धरणे आंदोलन

महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समितीचे धरणे आंदोलन

महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समितीचे धरणे आंदोलन

सेलू प्रतिनिधी:-

 राज्यातील जाचक अवैध सावकारी मुळे होणाऱ्या शेतकरी व श्रमिकांच्या आत्महत्या तसेच सावकारग्रस व सावकार पिढीत जनतेच्या विविध प्रश्नांवर महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या दिनांक २७ फेब्रुवारी पासून मुंबई येथे सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आझाद मैदान येथे महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समिती च्या वतीने दिनांक ८ मार्च ते १० मार्च दरम्यान तिन दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील जाचक अवैध सावकरी मुळे नशिक, बीड (कळंब) येथे झालेल्या शेतकरी आत्महत्या पाहता राज्यात अवैध सावकरी व त्यामुळे पिढीत शेतकऱ्यांचा होणारा छळ वाढत चालला आहे. शासनाने गेल्या ३ वर्षापासून सावकारी कायदा दुरुस्ती विधेयक गुंडाळून ठेवले आहे. त्यामुळे सहकार विभागातील प्रशासकीय अधिकारी सावकारी कायद्यातील त्रुटीचा गैर फायदा घेउन पैसे खाऊन सावकारांच्या बाजूने निकाल देत आहेत. त्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात सावकरी कायदा २०१४ दुरूस्ती साठी गठीत समितीचा अहवाल त्वरित उघड करून सुधारणा विधेयक लागू कारा, सावकारी कायदा कलम १८(१)मधील कालमर्यादा ३० वर्ष वाढून ती तक्रार दाखल केल्यापासून गृहीत धरा व काल मर्यादेमुळे खारीज प्रकरणे नव्यानं सुरु करा. पिढीत शेतकरी वर्गाच्या ताब्यातील जमिनीचे सात बारा बनून द्या व त्यांना कर्ज मुक्तीचे प्रमाणपत्र द्या. राज्यांतील अवैध सावकारी नियंत्रित आणण्यासाठी जिल्हास्तरीय प्रशासकीय समितीवर सावकार पिढीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून घ्या. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे लगाम घालविण्यासाठी अस्तित्वात असलेल्या समितीचा राज्यभर विस्तार कारा , सावकारी प्रकरणातील सुनावणी दरम्यान होणारा राजकीय हस्तक्षेप व कलम १५ चा दुरुपोग थांवण्यासाठी तसेच कलम १३ची कठोर अमल बजावणी होण्यासाठी सहकार विभागातील ५ वर्षापेक्षा जास्त एकच जागेवर सतत सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंतरविभगिय बदल्या करुण सावकारी प्रकरणा साठी विशेष न्यायालये स्थापन करा व अवैध सावकारी हा संघटीत गुन्हेगारीचा प्रकार असल्याने सावकारांकडून पिढीत शेतकरी वर्गाची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी सदरील प्रकरणात महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९(मोक्का) नुसार तक्रार दाखल करण्याची तरतूद करा. या मागण्यांसाठी महाराष्ट्र सावकार ग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने समितीचे संस्थापक अध्यक्ष नेताजी अरूण जाधव, प्रदेश अध्यक्ष बालासाहेब भाबट खादगावकर, कर्याध्यक्ष अशोकराव वाटणे, नाशिक विभागीय अध्यक्ष दिपक जाधव, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष अमोल आळंजकर व महिला प्रदेशध्यक्ष श्रीमती सुप्रीया आखाडे यांच्या नेतत्वाखालील आयोजित केले आहे. तरी राज्यांतील सर्व सावकार ग्रस्त शेतकरी वर्गाने हजर राहावे असे आवाहन महाराष्ट्र सावकार ग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने केले आहे.