आज मुंबई विरुद्ध राजस्थान... मुंबईला विजयाची गरज

आज मुंबई विरुद्ध राजस्थान... मुंबईला विजयाची गरज

इंडियन प्रीमियर लीगमध्ये 14 वा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा असणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे मैदानार खेळवला जाणार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर आजतरी मुंबई विजयाचे खाते उघडणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण दरवेळीप्रमाणे मुंबईने पहिला सामना सलग १२ वर्षे गमावला आहे.याही वर्षी हि परंपरा कायम ठेवत मुबंईने हंगामातील पहिले दोन सामने गमावलेत यात पहिला सामना गुजरात विरुद्ध तर दुसरा सामना हैद्राबाद विरुद्ध झाला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स तिसऱ्या सामन्यात चांगली खेळी करून विजय मिळवावा अशी भावना मुंबईच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.        

मुंबई इंडियन्सला यंदाच्या मोसमात खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तर दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्सने खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला. अशातच मुंबईवर राजस्थान रोखण्यासह पहिला विजय मिळवण्याचे आव्हान असणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी खेळेल. तसेच विजयासह मुंबईला नेट रनरेट देखील सुधारण्याची आवश्यकता आहे. कारण आयपीएलच्या 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावर आहे. तर सलग दोन पराभव झाल्यामुळे मुंबई पॉईंटटेबल वर १० नंबर आहे .  

मुंबई संघाचे खेळाडू 

 हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, टिळक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका. 

राजस्थान संघाचे खेळाडू 

संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रायन पराग, रोवमन पॉवेल, क्रुणाल सिंग राठोड, आर अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, टी. बोल्ट, नांद्रे बर्जर, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, केशव महाराज, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.