केआयटीच्या विश्व तांबेचे राष्ट्रीय स्तरावरील पॅरा स्पर्धेत यश ..!

केआयटीच्या विश्व तांबेचे राष्ट्रीय स्तरावरील पॅरा स्पर्धेत यश ..!

कोल्हापूर - कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी विश्व तांबे याने राष्ट्रीय स्तरावरील पॅरा (दिव्यांग) टेबल टेनिसच्या  क्लास १० गटात दैदीप्यमान यश संपादन केले आहे. 

वडोदरा गुजरात येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अल्टिमेट टेबल टेनिसच्या २ ऱ्या पॅरा नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिप २४ - २५ स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी मध्ये कांस्यपदक, मिक्स डबल मध्ये सुवर्णपदक, पुरुष एकेरी मध्ये रजत पदक, पुरुष दुहेरी मध्ये कांस्यपदक प्राप्त केले. तसेच २४ - २७ मार्च २५ रोजी दिल्ली येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये पुरुष एकेरी मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. 

संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. उदय भापकर यांचे प्रोत्साहन लाभले तर भविष्यात विश्वने आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलम्पिक मध्ये सुद्धा अशीच दर्जेदार कामगिरी करावी अशा शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.विजय रोकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला मिळाले.