डी.वाय. पाटील फार्मसीमध्ये एआय इनोव्हेशन राष्ट्रीय स्पर्धा संपन्न ..!

कोल्हापूर - डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयक्यूएसी विभाग आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या सहकार्याने "आरोग्यसेवा आणि वैज्ञानिक संप्रेषणातील एआय इनोव्हेशनचे ब्रिजिंग" या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा संपन्न झाली. कर्नाटक, गोवा, छत्तीसगडसह महाराष्ट्रातील १७५ हून अधिक सहभागीनी एआय - चालित आरोग्यसेवा उपाय आणि वैज्ञानिक संप्रेषणाच्या क्षेत्रात त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि संशोधनाचे प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून रिपकोर्ड फार्मास्युटिकल कंपनीचे व्यवस्थापन संचालक भाविन मधू तर प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राकेश सोमाणी व लातूर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला उपस्थित होते. कर्नाटक, गोवा, छत्तीसगडसह महाराष्ट्रातील १७५ हून अधिक सहभागीनी एआय-चालित आरोग्यसेवा उपाय आणि वैज्ञानिक संप्रेषणाच्या क्षेत्रात त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि संशोधनाचे प्रदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्यसेवा आणि वैज्ञानिक संप्रेषण याबाबतच्या कल्पना मांडून शैक्षणिक, उद्योग आणि संशोधन संस्थांमध्ये सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाविन मधू म्हणाले, भारतीय औषध निर्माण क्षेत्र अर्थात फार्मसी जगात अव्वल स्थानी असून या क्षेत्रात करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहे. डॉ. राकेश सोमाणी म्हणाले, पृथ्वीवर शेवटचा मनुष्य जिवंत असेपर्यत फार्मसी क्षेत्राची गरज भासणार आहे. डॉ. श्रीनिवास बुमरेला म्हणाले विद्यार्थ्यांना यशाची उत्तुंग शिखरे गाठायची असल्यास कठोर परिश्रमाला पर्याय नाही. डॉ. आर. के. शर्मा म्हणाले, फार्मसीच्या विद्यार्थ्याना मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या ज्ञानाचा व अनुभवाचा चांगला फायदा मिळेल. डॉ. एन. आर.जाधव म्हणाले आरोग्य यंत्रणेत फार्मासीस्टची भूमिका महत्वाची आहे. कोविड काळात भारतीय फार्मसी क्षेत्राला जगाला मोठा आधार दिला. जगात सर्वाधिक औषध निर्माण करणाऱ्या देशात भारतला महत्वाचे स्थान आहे. फार्मसी क्षेत्रातील तज्ञ - डॉ. शशिकांत भंडारी, डॉ. सतीश पोलशेट्टीवर, डॉ. रवींद्र जरग, डॉ. फिरोज तांबोळी, डॉ. अभिजीत कुलकर्णी, डॉ.दीनानाथ गायकवाड, डॉ.सोमनाथ भिंगे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे -
- पोस्टर प्रेझेन्टेशन (पीजी) :
प्रथम - श्वेता पारीख (भारती विद्यापीठ, कोल्हापूर)
द्वितीय - गौरव खैरे व अभिजित दास (एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे)
तृतीय - ज्ञानेश्वर माने, संभाजी जाधव, प्रसाद कोळी (भारती विद्यापीठ, कोल्हापूर)
- पोस्टर प्रेझेन्टेशन (युजी) :
प्रथम - उदयनराज भोसले (फार्मसी कॉलेज मालवाडी)
द्वितीय - सायमा पटवेगार, सिमरन पटवेगार(डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी)
उत्तेजनार्थ - करण भेडसे, अविनाश शिंदे, रुपाली रौला (अशोकराव माने इंस्टीट्युट ऑफ फार्मसी, सावे)
- ओरल प्रेझेन्टेशन संयुक्त विजेते-
प्रथम - प्रेरणा परदेसी आणि मधुरा शिंदे
द्वितीय -प्रेरणा भोसले (सर्व एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे)
उत्तेजनार्थ - सोमेश चव्हाण (डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी)
सूत्रसंचालन प्रा.सोनाली दिवटे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अभिनंदन पाटील यांनी केले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, कृष्ण इन्स्टिट्यूटचे अधिष्ठाता डॉ. एन. आर.जाधव, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, नर्सिंग कॉलेज प्राचार्य डॉ. उमाराणी जे. आदी उपस्थित होते.