इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स संस्थेच्या अध्यक्षपदी प्रशांत हडकर

कोल्हापूर - कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असलेल्या इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनीअर्स या राष्ट्रीय संस्थेच्या कोल्हापूर सेंटर अध्यक्षपदी कोल्हापूरचे इंजिनीअर प्रशांत सुभाष हडकर यांची निवड करण्यात आली आहे. तर संस्थेच्या उपाध्यक्षपदी इंजिनीअर मंदार आंबेकर आणि सचिवपदी जिया मोमीन यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -
खजानिस सचिन मेहता, संचालक रणजीत जाधव, डॉ. रश्मी जाधव, निरंजन वायचळ (सर्व कोल्हापूर) तसेच विजय देवी (सातारा) नंदकुमार बने, हिमांशू पाटील आणि प्रणव कुलकर्णी (तिघे सांगली जिल्हा).
नूतन अध्यक्ष प्रशांत हडकर हे कोकणचे सुपुत्र असून, कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि महापालिकेच्या स्ट्रक्चरल इंजिनीअर ऑडिट पॅनलवरही ते कार्यरत आहेत.