जागतिक पितृदिन उत्साहात संपन्न
कोल्हापूर प्रतिनीधी: वशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट संलग्न ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन वतीने रविवार दि.१६ मे २०२४ रोजी महावीर गार्डन कोल्हापूर येथे जागतिक पितृदिन उत्साहात संपन्न झाला. आपले दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा एकमेव देवमाणूस म्हणजे वडील.,प्रत्येकाच्या आयुष्यात आई प्रमाणेच वडिलांचे स्थानही महत्त्वाचे असते. त्यांनी आपल्याला दिलेल्या ह्या सुंदर आयुष्याबद्दल त्यांचे आभार मानन्याचा दिवस म्हणजे पितृदिन,
जून महिन्यातील तिसरा रविवार ‘आंतरराष्ट्रीय पितृदिन’ म्हणून साजरा केला जातो.वडील हे नेहमी मुलाचे सर्वोत्तम मित्र आणि सल्लागार असतात.बाप करुणेचा सागर ,बाप डोईवरची झालर.,बाप सुखाचा नागर ,बाप ग्रीष्मातली तहान,बाप देवाहून महान.,करिअर साठी धावपळ करणाऱ्या, बाळापासून दूर राहून नोकरी करणाऱ्या विविध क्षेत्राती वडिलांना जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा वुशू खेळाडूंनी आपल्या वडिलांना पुष्प देऊन वंदन केले.
प्रारंभी खेळाडूच्या वडिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी वडिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच *राष्ट्रीय खेळाडू मोहन ढवळे यांनी वडिलांच्या कष्टाची, नि:स्वार्थी प्रेमाची ,त्यागाची गाथा गायली,* *आणि याबरोबरच भारतीय संस्कृती जतन करणे, आजच्या मोबाईल युगात वडील आणि मुलांचा संवाद होणे, आई - वडील आणि राष्ट्र प्रेम वाढावे या कार्यक्रमाचा उद्देश असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश वडणगेकर यांनी स्पष्ट केला* .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया कुंभार आणि आभार प्रदर्शन अस्मिता आरेकर यांनी केले.
याप्रसंगी प्रशिक्षक खेळाडू माता उपस्थित होते.