‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार एअर स्ट्राईक ; पाकिस्तानी तरूणाने सांगितला थरारक अनुभव

ऑनलाईन डेस्क - पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत फक्त १५ दिवसांत मोठी कारवाई केली आहे.
या एअर स्ट्राईकमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांनी समन्वय साधत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. हल्ल्यात जैश - ए - मोहम्मद, लष्कर - ए - तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.
पाकिस्तानी तरूणाने सांगितला थरारक अनुभव -
एअर स्ट्राईक संदर्भात एका पाकिस्तानी युवकाने आपला अनुभव सांगितला. तो म्हणाला की, “रात्री पावणेबाराच्या सुमारास आम्ही झोपलेलो होतो. एक ड्रोन आला, मग आणखी तीन आले आणि लगेचच हल्ला झाला. काहीच शिल्लक राहिलं नाही.”
भारतीय लढाऊ विमानांनी अवघ्या २५ मिनिटांत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणांवर लक्ष्यभेदी हल्ला केला. यातील ४ तळ पाकिस्तानमध्ये आणि ५ तळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते. या हल्ल्यावेळी भारतानं केवळ दहशतवादी तळांनाच लक्ष्य केलं, नागरी वस्त्यांना कोणतीही हानी पोहोचवलेली नाही.