केआयटी मध्ये स्टुडन्ट इंडक्शन उपक्रमाचे उद्घाटन.

केआयटी मध्ये  स्टुडन्ट इंडक्शन उपक्रमाचे उद्घाटन.

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केआयटी अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश निश्चित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या वतीने स्टुडंट इंडक्शन प्रोग्रॅम चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांच्या हस्ते झाले.

संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित केले .सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विद्यार्थी दशेत घ्यावयाची काळजी तसेच अभियांत्रिकीसाठी भविष्यात असणाऱ्या उज्वल संधी याबाबत मार्गदर्शन केले. प्रथम वर्ष विभागाचे विभाग प्रमुख डॉ.डी.जे. साठे यांनी इंडक्शन कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना सांगितला.शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.अक्षय थोरवत यांनी महाविद्यालयात लागू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० बद्दल थोडक्यात विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ. जितेंद्र भाट यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची, व्यासपीठांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.

संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांनी सर्व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निवास पाटील व प्रा.श्रुती काशीद यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. क्षितिजा ताशी यांनी मानले.