कोरे अभियांत्रिकीच्या २२ विद्यार्थ्यांची टीसीएस कंपनीत निवड

कोरे अभियांत्रिकीच्या २२ विद्यार्थ्यांची टीसीएस कंपनीत निवड

वारणानगर (प्रतिनिधि) : येथील श्री तात्यासाहेब कोरे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधील कम्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील २२ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी. सी .एस ) या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर या पदासाठी कॅंपस इंटरव्हयु मध्ये निवड झाली. 22 विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांना 7.01 लाख प्रतिवर्षी व पंधरा विद्यार्थ्यांना 3.36 लाख प्रतिवर्षी एवढे पॅकेज मिळाले.अशी माहिती श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजीन्नी यांनी दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे अशी .. कम्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग: प्रतिक पाटील, साक्षी मोहिते, सिद्दीक मुलानी, सुशांत तांबडे, विनायक पवार, विश्वजीत भोसले, आदित्य निकम, अथर्व कदम, भावेश कोराने, प्राची वरुडे, प्रितेश पाटील प्रियांका विधाते, समृद्धी भोसले, सार्थक पाटील, शैलेश लोखंडे, शिरीष कांबळे, श्रावणी सूर्यवंशी, सोहन पाटील, प्रथमेश दळवी, सुष्मिता जनवडे, तेजस गुरव आणि तुषार पाटील होय.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉ. विनयरावजी कोरे यांनी सत्कार करून विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर प्लेसमेंट बद्दल विनय कोरे यांनी समाधान व्यक्त केले व प्लेसमेंट सेल च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजीन्नी, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. माने, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर प्रा. पी. जे. पाटील, सहयोगी ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर प्रा. राजकुमार शिक्केरी आणि विविध विभागाचे सर्व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे समन्वयक यांचे मार्गदर्शन लाभले.

टीसीस कंपनी विषयी अधिक माहिती देताना ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर प्रा. पी. जे. पाटील म्हणाले कि, आंतरराष्ट्रीय स्तरावर संगणक व सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतातील अग्रमानांकित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीची जगभरात ४६ देशांमध्ये २३० कार्यालये असून माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ३ लाखापेक्षा जास्त तज्ञ कार्यरत आहेत. जागतिक बाजारपेठेत सॉफ्टवेअर निर्यातीत टी. सी .एस हि कंपनी सर्वात मोठी भारतीय कंपनी ठरली आहे.