कोल्हापुरात कॉलेजच्या नावाखाली कॅफेमध्ये अश्लील चाळे

कोल्हापुरात कॉलेजच्या नावाखाली कॅफेमध्ये अश्लील चाळे

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

कोल्हापूर शहरात कॉलेजच्या नावाखाली कॅफेमध्ये अश्लील चाळे करणाऱ्यांवर आज निर्भया पथकाकडून कारवाई करण्यात आली.

कोल्हापूर निर्भया पथकाला कोल्हापूर शहरातील काही कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने ही कारवाई केली. शहरातील मिरजकर तिकटी, उमा टॉकीज चौक, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर येथे ही छापेमारी करण्यात आली. याप्रकरणी अश्लील चाळे करणाऱ्या 8 जणांसह कॅफे चालकाला ताब्यात घेण्यात आले असून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.https://youtu.be/eMN7yuHfFkw