HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

लक्ष्य अकॅडमीमुळे युवकांना जीवनाची दिशा मिळाली - राहुल पाटील

लक्ष्य अकॅडमीमुळे युवकांना जीवनाची दिशा मिळाली - राहुल पाटील

कोल्हापूर - एकीकडे बेरोजगारीमुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असताना लक्ष्य करिअर अकॅडमीसारख्या संस्थेने सळसळत्या तरुणाईला देशप्रेमाचे धडे देत त्यांच्या जीवनाला शाश्वत आकार देण्याचे काम केले आहे. या अकॅडमीतून यशस्वी झालेले विद्यार्थी हेच उद्याच्या भारताचे भविष्य असून या अकॅडमीचे कार्य दीपस्तंभासारखे तेजोमय आहे असे गौरवोदगार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील - सडोलीकर यांनी काढले. भोगावती शिक्षण मंडळातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यावेळी ते बोलत होते. 

भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने स्व. आमदार पी. एन. पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित विविध क्षेत्रातील यशवंत आणि गुणवंतांच्या सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी राहुल पाटील यांनी लक्ष्य करिअर अकॅडमीच्या पुजा खरोशे मुंबई पोलीस, तनुजा कोठावळे पुणे कारागृह पोलीस, पुजा पाटील पुणे कारागृह पोलीस या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या. दुर्गम भागात उभा केलेली ही अकॅडमी राज्यभरात नावलौकिक मिळवत असल्याबद्दल राहुल पाटील यांनी लक्ष्य करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे यांचे कौतुक केले.  

यावेळी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे, व्हा.चेअरमन मोहन पाटील, संचालक रोहित पाटील, प्राचार्य चौगले, व्ही.डी.पाटील, उपप्राचार्य निवास पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी व्हा.चेअरमन वसंतराव पाटील उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.