महाविद्यालयीन तरुण-तरुणींना ग्रामीण जीवनाची ओळख होण्यासाठी श्रमसंस्कार शिबिराची गरज

महाविद्यालयीन तरुण-तरुणींना ग्रामीण जीवनाची ओळख होण्यासाठी श्रमसंस्कार शिबिराची गरज

गुडाळ प्रतिनिधी संभाजी कांबळे 

महादेवराव कोथळकर महाविद्यालयीन तरुण-तरुणींना ग्रामीण जीवनाची ओळख होण्यासाठी श्रमसंस्कार शिबिराची गरज - महादेवराव कोथळकर

महाविद्यालयीन तरुण तरुणींना ग्रामीण जीवन आणि गाव पातळीवरील समस्यांची ओळख होण्यासाठी निवासी श्रमसंस्कार शिबिर हे योग्य माध्यम आहे. असे प्रतिपादन गुडाळ येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व भोगावतीचे माजी संचालक महादेवराव कोथळकर यांनी केले. 

राधानगरी येथील जेनेसिस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी च्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत गुडाळ येथे आयोजित श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सविता अशोक पाटील या होत्या. 

उपस्थितांचे स्वागत अर्पिता पाटील यांनी केले. जेनीसिस चे प्राचार्य शोभराज माळवी यांनी प्रास्ताविक भाषणात या निवासी संस्कार शिबिरात चार दिवस राबविण्यात येणाऱ्या विविध विधायक उपक्रमांची माहिती दिली. 

याप्रसंगी डॉ. प्रतीक मस्के, डॉ. निलेश देसाई, गुडाळ गावचे माजी सरपंचअभिजीत पाटील माजी उपसरपंच, संजय मोहिते यांचीही भाषणे झाली.

या कार्यक्रमास लक्ष्मीनारायण उद्योग समूहाचे संस्थापक शिवाजीराव पाटील, भोगावती सहकारी साखर कारखाना माजी संचालक व्ही डी पाटील, सविता पाटील, गुडाळेश्वर सेवा सोसा, माजी, चेअरमन आनंदराव माळवी, शिवाजी मोहिते, बाबुराव भोई, सखाराम पाटील अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुराज पाटील यांनी केले तर आभार सनी पाटील यांनी मानले. 

या कार्यक्रमास सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिबिरार्थीसह गुडाळ- गुडाळवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.