गड, किल्ल्यांवर मद्यसेवन, गैरशिस्तीने वागल्यास होणार कारवाई

गड, किल्ल्यांवर मद्यसेवन, गैरशिस्तीने वागल्यास होणार कारवाई
6 महिन्यांच्या कारावास आणि 10 हजार रुपये दंड

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी 

राज्यातील गड, किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करुन गैरशिस्तीने वागल्याचे आढळून आल्यास आता महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. 

या कायद्यान्वये पहिल्या अपराधास 6 महिन्यापर्यंत सश्रम कारावासाची आणि 10 हजार रुपयापर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतर या शिक्षेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिली आहे.