भारतीय पोस्ट खात्यात हिंदकेसरीच्या खेळाडूंची निवड*

भारतीय पोस्ट खात्यात हिंदकेसरीच्या खेळाडूंची निवड*

सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ

हिंदकेसरी स्पोर्ट्स कवठेपिरानचा कु.प्रदुम्न शिवाजी पाटील व कु. अभिषेक शशिकांत पवारयांची यांची नुकतीच निवड झाली आहे हिंदकेसरी पैलवान मारुती माने भाऊ यांच्यापासून प्रेरणा घेऊन 1995 मध्ये पै भीमराव माने अण्णा यांच्या नेतृत्वाखाली सुधाकर माने यांनी स्थापन केलेल्या संस्थेत खो खो खेळाडू तयार करण्यात आलेल्या या संस्थेच्या खेळाडूंची भारतीय पोस्ट विभागात निवड झाली आहे.

प्रदूम्न पाटील हा खेळाडू आत्तापर्यंत शालेय, असोसिएशनच्या स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे तसेच विद्यापीठ स्पर्धेत आंतर विद्यापीठ अश्वमेघ स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी उत्तम खेळ खेळला आहे एक अत्यंत संयमी व शांत खेळाडू म्हणून तो ओळखला जातो.

अभिषेक पवार हा खेळाडू खो-खो तील किशोर गटाचा भरत अवार्ड विजेता खेळाडू आहे तोही किशोर गटापासून विद्यापीठ स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे सर्व गटात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या खेळाचा सराव केला आहे.

या दोघांची निवड झाली आहे यापूर्वी कुमारी तेजस्वीनी देसाई या खेळाडू मुलीची निवड झाली आहे भारतीय पोस्ट खात्यात भारत सरकारच्या खेळाडून प्रोत्साहन देण्यासाठी पाच टक्के खेळाडूंच्या कोट्यातून निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे हार्दिक अभिनंदन त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे पै भीमराव माने अण्णा अर्जुन माने आप्पा सुधाकर माने सर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच हिंदकेसरी स्पोर्ट्स कडून या दोन निवड झालेल्या मुलांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले आहे.