HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

महाराष्ट्रात बर्ड फ्लू ची एंट्री , मानवांमध्ये लक्षणे काय?

महाराष्ट्रात बर्ड फ्लू ची एंट्री , मानवांमध्ये लक्षणे काय?

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : नांदेड जिल्ह्यातील किवळा इथं मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पशूसंवर्धन विभागानं परिसरातील कोंबड्या आणि अंडी नष्ट केली आहेत.पशू संवर्धन विभागानं आता परिसरात उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनीही कोंबड्याचं मांस खाताना शिजवून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच प्रशासनाने नागरीकांनी भीती बाळगू नये असंही सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील ढालेगाव येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये अलिकडेच 4000 हून अधिक पिल्लांचा मृत्यू झाल्याने बर्ड फ्लू होण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे 50 कावळ्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. ही घटना बर्ड फ्लूच्या वेगाने होणाऱ्या प्रसाराकडे निर्देश करते का आणि हा आजार मानवांसाठी किती धोकादायक आहे?

ढालेगावच्या पोल्ट्री फार्ममध्ये पिल्लांच्या मृत्यूनंतर प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. या पिल्लांच्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा विषाणू केवळ पक्ष्यांनाच नाही तर इतर प्राण्यांना आणि मानवांनाही प्रभावित करू शकतो.

मानवांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे

  • जास्त ताप आणि थंडी वाजून येणे
  • स्नायू दुखणे
  • डोकेदुखी आणि थकवा
  • खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे
  • नाक आणि हिरड्यांमधून रक्त येणे
  • डोळ्यांत जळजळ होणे
  • पोटदुखी आणि अतिसार

बर्ड फ्लू कसा रोखायचा?

  • पक्ष्यांशी संपर्क टाळा, विशेषतः संक्रमित भागात.
  • पोल्ट्री उत्पादने पूर्णपणे शिजवल्यानंतर खा.
  • स्वच्छता पाळावी
  • संक्रमित प्राण्यांपासून दूर रहा 
UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.