चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी पुढाकार घेणार - अमल महाडिक

चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी पुढाकार घेणार - अमल महाडिक

कोल्हापूर प्रतिनिधी - महायुती सरकारने संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून चर्मकार समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सरकारच्या या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी पुढाकार घेणार असल्याचे अभिवचन कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माहायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांनी दिले. 

उचगावमधील चर्मकार समाजाने अमल महाडिक यांना पाठींबा दिला. यावेळी येथील संत रोहिदास समाज मंदिर येथे उपस्थित समाज बाधंवांशी महाडिक यांनी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात विश्वकर्मा समाजासाठी कौशल्य प्रशिक्षण व मानधन सारख्या विविध योजना राबविल्या आहेत. देशातील प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत आहे. प्रत्येक व्यक्तीला समृद्ध जीवन जगता आले पाहिजे यासाठी सरकार सुरुवातीपासून कार्यरत आहे. असे महाडिक यावेळी म्हणाले. 

यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या योजनांची माहिती दिली. अवघ्या अडीच वर्षाच्या काळात सरकारने घेतलेले ऐतिहासिक निर्णयांमुळे कित्येक वर्षे प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. अगदी याचप्रमाणे मी सरकारच्या माध्यमातून मतदासंघातील प्रत्येक नागरिकाच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे. असे ते म्हणाले. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे अख्ख्या मतदारसंघातून लाखो बहिणी माझ्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. त्या माझ्या पाठीशी उभ्या आहेत. त्यामुळे इथून पुढे त्यांचे काम करण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

यावेळी चर्मकार समाज बांधव विश्वजीत मोरे, तानाजी मोरे, पंडित मोरे, सागर अबरगे, भरत अबरगे, शिवाजी मोरे, अजित मोरे, सौदव चव्हाण, आदेश चव्हाण, गौरव चव्हाण, महादेव चव्हाण तसेच महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महेश चौगुले, अनिल शिंदे, राजेंद्र सकपाळ, नामदेव वाईंगडे (एन डी), राजेंद्र चौगुले, सारंग चौगुले, उमेश निगडे, अमोल निगडे, विजय हंकारे, प्रविण चव्हाण, अमित अवघडे, उमेश पाटील, सतिश मर्दाने, संदीप कुंभार, अमोल भोसले, रूपेश परीट, संदीप म्हसवेकर यांच्यासह चर्मकार समाजातील बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.