जागतिक स्पर्धेत आपली कौशल्येच आपल्याला यशापर्यंत पोहोचवतील - प्रा. पी. बी. घेवारी

जागतिक स्पर्धेत आपली कौशल्येच आपल्याला यशापर्यंत पोहोचवतील - प्रा. पी. बी. घेवारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये (स्वायत्त महाविद्यालय) जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयाच्या स्कील डेव्हलपमेंट विभागाच्या वतीने कॅम्पस डायरेक्टर प्रा. पी. बी. घेवारी यांचे "युथ एम्पॉवरमेंट थ्रू एआय अँड डिजिटल स्किल्स" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. जागतिक स्पर्धेत आपली कौशल्येच आपल्याला यशापर्यंत पोहोचवतील असे प्रतिपादन प्रा. पी. बी. घेवारी यांनी यावेळी काढले. 

एआय आणि डिजिटल कौशल्यांद्वारे युवा सक्षमीकरण या रूपरेषेखाली आयोजित व्याख्यानामध्ये कॅम्पस डायरेक्टर प्रा. पी. बी. घेवारी म्हणाले, "आजच्या युगात केवळ पदवी असून चालत नाही, तर त्यासोबत तंत्रज्ञानावर आधारित कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. एआय, डेटा अ‍ॅनालिटिक्स, सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, डिजिटल मार्केटिंग यासारख्या क्षेत्रांत आधुनिक कौशल्यांची गरज आहे. युवकांनी तांत्रिक शिक्षणाबरोबरच स्कील डेव्हलपमेंटकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संधी आजच्या पिढीला उपलब्ध असून त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि तयारी गरजेची आहे. यासाठी महाविद्यालयाने स्वतंत्र स्किल डेव्हलपमेंट विभागाची स्थापना केली आहे.

महाविद्यालयामध्ये प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना यांद्वारे युवकांना कौशल्याधारित शिक्षण दिले जात आहे. स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी युवकांनी स्वतःला सातत्याने अद्ययावत ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्ये विकसित करावीत असंही प्रा. पी. बी. घेवारी म्हणाले. 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक स्कील डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. श्वेताली रांजणे यांनी केले, तर आभार डीन स्टुडंट अफेअर्स डॉ. जे. एम. शिंदे यांनी मानले. 

या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष विजयसिंह माने, जिल्हा परिषद माजी सदस्या मनिषा माने, महाविद्यालयाच्या संचालक प्रा. डॉ. सौ. एस. आर‌. चौगुले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. दिग्विजय पवार, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. अमोल सूर्यवंशी, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. व्ही. एस. वाडकर, प्रा. गणेश लोळगे आदींसह कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर, इलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.