जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेतील दोन महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या बदल्यांना अखेर मंजुरी मिळाली असून,  त्यांच्या बदलीचे  आदेश जारी करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांची गडचिरोली जिल्हा परिषदेकडे त्याच पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी परभणी जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले ओ. पी. यादव यांची कोल्हापुरात बदली करण्यात आली आहे.

तसेच, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांची बदली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नंदुरबार जिल्ह्यातील गटविकास अधिकारी जयवंत उगले यांची नियुक्ती झाली आहे. उगले हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील असून, यापूर्वी त्यांनी करवीर तालुक्यातही गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.