HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

हातकणंगले (प्रतिनिधी) : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई येथे सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ कन्नन गिरीश यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अनिल शर्मा उपस्थित होते.

         घोडावत यांनी पश्चिम महाराष्ट्र व बेळगाव येथे शैक्षणिक संकुलाची निर्मिती केली आहे. केजी टू पीएचडी पर्यंतचे शिक्षण इथे घेता येते.येथील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. उत्कृष्ट प्रॅक्टिकल लॅब, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या. आहेत. संजय घोडावत विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिले जाते.तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व कौशल्य वाढीस लागावे यासाठी विविध कोर्सेस व वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.

         शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही येथील विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा गाजवत आहेत. स्कूल, विद्यापीठ यांच्यामार्फत सामाजिक कार्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर घालून दिला आहे.

        या पुरस्काराबद्दल बोलताना अध्यक्ष संजय घोडावत म्हणाले,की विद्यापीठाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून पायाभूत सोयी सुविधा वातावरण व कोर्सेसची निर्मिती केली आहे. येथे कार्यरत असणाऱ्या सर्व प्राध्यापक,अधिकारी,कर्मचारी यांच्यामुळे विद्यापीठाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. विद्यार्थी व पालकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे यश मिळाले आहे.जागतिक स्तरावर विद्यापीठ नवा रूपाला आणणेचे आमचे प्रयत्न आहेत. या यशाचे श्रेय विश्वस्त विनायक भोसले,कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, प्राचार्य डॉ. विराट गिरी, संचालक श्री वासू ,संचालक-प्राचार्य सस्मिता मोहंती, इतर सर्व डीन,  प्राचार्य,प्राध्यापक, कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीचे आहे.

      या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून संजय घोडावत यांचे अभिनंदन होत आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.