डी. वाय. पाटील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत 11 जून रोजी सेमिनार

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत 11 जून रोजी सेमिनार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने (स्वायत्त संस्था) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2024-25 बाबत मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 11 जून रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल सयाजी येथे हा सेमिनार होणार आहे. यावेळी  डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता मार्गदर्शन करणार आहेत.

               गेल्या 40 वर्षांपासून गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ओळखले जाते. उच्च शैक्षणिक परंपरेच्या या संस्थेला 2021 मध्ये स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला असून एनबीए मानांकनही प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती मिळावी या हेतूने डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय गेली 11 वर्षे या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करत आहे.  या सेमिनारला दरवर्षी सुमारे 1200 हून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती असते.

                 

                      मंगळवारी होणाऱ्या या सेमिनारमध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेशी संबंधित सर्व विषयांवर डॉ. गुप्ता सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची सद्यस्थिती, अभियांत्रिकीमधील भविष्यातील ट्रेंड, अभियांत्रिकीनंतरच्या करिअरच्या विविध संधी, आरक्षण व जागा वाटप, सरकारकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिप, एमएचटी- सीईटी 2024 च्या निकालाचे विश्लेषण आणि संभाव्य मेरीट लिस्ट नंबर, राज्यातील टॉप कॉलेजचा कट ऑफ, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक व आवश्यक कागदपत्रे, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2024-25 मधील महत्वाचे बदल,  कॉलेजला महत्व द्यावे कि शाखेला याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. 

    

                     यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले जाणार असून अभियांत्रिकीमधील उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी- पालकांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे व  अॅडमिशन सेलचे प्रमुख प्रा. रविंद्र बेन्नी  यांनी केले आहे.