किर्लोस्कर कंपनीच्यावतीने हर घर‌ वृक्ष व तिरंगी धान्याचे वाटप

किर्लोस्कर कंपनीच्यावतीने हर घर‌ वृक्ष व तिरंगी धान्याचे वाटप
किर्लोस्कर कंपनीच्यावतीने हर घर‌ वृक्ष व तिरंगी धान्य वाटप

मलकापूर / प्रतिनिधी 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त डॉ व्ही. टी. पाटील फाऊंडेशन आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीच्यावतीने हर घर वृक्ष आणि 75 वंचित महिलांना तीन रंगी धान्याचे वाटप करण्यात आले.

वसुधा वंदन या उपक्रमांतर्गत चाळणवाडी, बोटांगळेवाडी, हनुमंतवाडी येथील प्रत्येक कुंटूबात एक घर, एक फळ झाड देवून शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्यात आली. तर तळवडे, सुपात्रे, सोडोली येथील महिला बचत गटांना आणि माण, दिवाणबाग, विशाळगड, चाळणवाडी, कांबळे वाडी, धाऊडवाडा, माळेवाडी येथील प्राथमिक शाळांना वृक्ष वाटप केले. सुमारे चाळीस हजार रुपयेची हापूस आंबा, कापा फणस, काजू, आवळा, बेल, पेरू या जातीची झाडे लावण्यात ‌आली.


यावेळी संस्थेच्या विश्वस्त कांचनताई परूळेकर, जयश्री गायकवाड, राजेंद्र लाड, संदिप पाटील, कंपनीचे सामाजिक अधिकारी शरद आजगेकर आदी उपस्थित होते.