नरेश मस्केंचा दावा; ठाकरे गटात पुन्हा भूकंप होणार का?

नरेश मस्केंचा दावा; ठाकरे गटात पुन्हा भूकंप होणार का?

लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले आहेत. या निवडणुकीत महायुतीला फक्त १७ जागांवर यश मिळालं आहे. अशात ठाकरे गटात पुन्हा एकदा भूकंप होणार का? या चर्चा सुरु झाल्या आहेत. फोडाफोडी होऊनही ठाकरेंच्या शिवसेनेने ९ खासदार निवडून आणले. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. अशात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी काम करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.

                  खासदार नरेश म्हस्केंनी हा दावा केला आहे की उद्धव ठाकरेंच्या गटातले दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत. दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क केला आहे. मतदारसंघात कामं झाली पाहिजेत ही त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी मोदींना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मुल्ला मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही. असं या खासदारांनी सांगितलं आहे. या खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाईचा धोका आहे. त्यासाठी या दोन खासदारांनी योजनाही तयार केली आहे. असंही नरेश म्हस्केंनी स्पष्ट केलं. आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आमि लवकरात लवकर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात नरेंद्र मोदींना आम्ही पाठिंबा देऊ असं या दोघांनी सांगितल्याचा दावा नरेश म्हस्केंनी केला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटात पुन्हा भूकंप होणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.