तब्बल १२ तासांनंतर केडीआरएफकडून ‘त्या’ तरुणाची सुटका

तब्बल १२ तासांनंतर केडीआरएफकडून ‘त्या’ तरुणाची सुटका
पूर बघण्यासाठी आला आणि झाडावर अडकला...

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

कोल्हापुरात सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशातच वारणा नदीचे पाणी पाहण्यासाठी गेलेला एक तरुण झाड्यावर अडकल्याची घटना घडली. झाडावर अडकलेल्या या तरुणाची तब्बल 12 तासांनी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थपनाच्या पथकाने सुखरुप सुटका केली आहे.

वारणा नदीकाठावर असणाऱ्या काखे गावच्या पुलावर पुराचे पाणी पाहण्यासाठी शिराळा तालुक्यातील लाटेवाडी येथील बजरंग खामकर हा तरुण गेला होता. यावेळी पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहासह वाहून गेला. जवळपास 12 ते 13 तास तो एका झाडावर अडकून होता. प्राथमिक माहितीमध्ये आत्महत्या करण्याच्या उद्देशाने त्याने वारणा नदीत उडी मारल्याचे सांगण्यात येत होते.मात्र त्याला बाहेर काढल्यानंतर आपला तोल गेल्यान पाण्यात पडल्याचे त्यांने स्पष्ट केले.