HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोल्हापुरात मनसेकडून ‘नाका तिथे शाखा’ उपक्रम

कोल्हापुरात मनसेकडून ‘नाका तिथे शाखा’ उपक्रम
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून ‘ही’ मोहीम हाती

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेकडून ‘नाका तिथे शाखा’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 


कोल्हापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज एकाच वेळी पंधरा शाखांचा उदघाटनांचा सोहळा पार पडला. या मोहिमेची सुरूवात टेंबलाई नाका, बीएसएनएल टॉवर पासून करण्यात आली. 

लोकांचे विभागीय पातळीवरचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसेकडून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तसेच सध्याच्या पूरस्थितीचा आढावा घेऊन सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी मनसेकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. कोल्हापूरमध्ये प्रथमच एकाच वेळी होणाऱ्या या पंधरा शाखांच्या उदघाटन समारंभाच्या निमित्ताने मनसे कोल्हापूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात होता.

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष निलेश धूम्मा, शहर सचिव निलेश आजगांवकर, शहर उपाध्यक्ष राजन हुल्लोळी, सुरज कानूगडे, शिवराज भोसले, कामगार सेना जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, विद्यार्थी सेना अध्यक्ष अजिंक्य शिंदे, सागर साळोखे, बाजीराव दिंडोर्ले इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.