मुंबई फोर्ट (मुंबई), निशिकांत दादा स्पोर्ट्स फौंडेशन (इस्लामपूर), साई स्पोर्ट्स छत्रपती संभाजीनगर उपउपाणंत्य फेरीत दाखल....*

मुंबई फोर्ट (मुंबई), निशिकांत दादा स्पोर्ट्स फौंडेशन (इस्लामपूर), साई स्पोर्ट्स छत्रपती संभाजीनगर उपउपाणंत्य फेरीत दाखल....*

कोल्हापूर प्रतिनिधी मुबारक आत्तार 

कोल्हापूर दि.१० (कसबा बावडा) येथील लाईन बझार हॉकी मैदानावर जिल्ह्याचे नेते व गटनेते मा. गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य लाईन बझार व पोलीस लाईन हॉकीप्रेमी च्या वतीने सुरु असलेल्या आजच्या दिवसातील लढतीत मुंबई फोर्ट (मुंबई), निशिकांत दादा स्पोर्ट्स फौंडेशन (इस्लामपूर) व साई स्पोर्ट्स छत्रपती संभाजीनगर यांनी उपउपाणंत्य फेरीत प्रवेश केला.

आजच्या दुपारच्या सत्रात झालेल्या पहिल्या चूरशिच्या सामन्यात मुंबई फोर्ट संघाने शाहू फौंडेशन संघाचा स्ट्रोकवर २-० गोलनी पराभव केला.

सामन्याच्या पूर्वाधार्थ २६ व्या मिनिटास मुंबई फोर्ट च्या रोहन पाटील ने पहिला गोल करत एक गोलची आघाडी घेतली. मात्र लगेचच २८ व्या मिनिटास शाहू च्या ऋतुराज कदम याने गोलची परतफेड करत सामना बरोबरीत आणला.

उत्तराधार्त दोन्ही संघाकडून गोल करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु निर्धारित वेळेत दोन्ही संघाना गोल करता आला नसल्याने सामन्यात ८ सेकंद स्ट्रोक चा वापर करण्यात आला. यामध्ये मुंबई फोर्ट संघाने हा सामना २-० गोलनी जिंकत उपउपाणंत्य फेरी गाठली. मुंबई कडून हरिष शिडगी व स्टेन स्वामी यांनी गोल केले. तर शाहुकडून अनिरुद्ध पाटील व प्रणव चौगुले यांना गोल करता आले नाहीत.

दुसऱ्या अतितटीच्या लढतीत निशिकांत दादा स्पोर्ट्स फौंडेशन इस्लामपूर संघाने देवगिरी फायटर्स वडगाव संघाचा १-० गोलनी पराभव केला. सामन्याच्या पूर्वाधार्थ २२ व्या मिनिटास इस्लामपूर च्या विश्वजित पाटील याने मैदानी गोल करत एक गोलची घेतली. उत्तराधार्त देवगिरी संघाकडून गोल करण्यासाठी प्रयत्न केले गेले परंतु, सामन्याच्या निर्धारित वेळेत त्यांना एकही गोल करता आला नसल्याने हा सामना निशिकांत दादा स्पोर्ट्स फौंडेशन इस्लामपूर संघाने १-० गोलनी जिंकत उपउपाणंत्य फेरीत प्रवेश केला. देवगिरी संघाकडून बचावफळी मध्ये खेळणाऱ्या अर्जुन भोसले याने चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.

तिसऱ्या आणि आजच्या शेवटच्या सामन्यात साई स्पोर्ट्स छत्रपती संभाजी नगर संघाने फलटण हॉकी फलटण संघाचा ४-१ गोलनी पराभव केला. सामन्याच्या पूर्वाधार्थ साई संभाजीनगर च्या भारत ने २१ व्या मिनिटास पहिला मैदानी गोल केला. त्यानंतर उत्तराधार्त २९ व्या मिनिटास धर्मेंद्र पाल याने दुसरा गोल करत संघास दोन गोलची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ३४ व्या मिनिटास संभाजीनगर साई संघास मिळालेल्या पेनल्ट्री कॉर्नरवर अमन शर्मा ने तिसरा गोल केला. ४२ व्या मिनिटास फलटण च्या विनय नेरकर ने गोल करत आघाडी कमी केली. त्यानंतर ४४ व्या मिनिटास साई च्या मोहित कला याने गोल करत साई संभाजीनगर संघास विजय मिळवून दिला.

सामन्यात पंच अनिकेत मोरे, राहुल गावडे, दीपक मालाई,धिरज पाटील, दत्ता पाटील, विजय जाधव, चेतन जाधव, संजय डोंगरे, सिद्धी जाधव, अस्मिता तोरसकर हे काम पाहत आहेत.

स्पर्धेचे सूत्रसंचालन सचिन कोलेकर करत असून स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सागर यवलुजे, संतोष पोवार, धनाजी तोरस्कर, दिपक पाटील अधिक परिश्रम घेत आहेत.

दिनांक ११/०५/२०२३ रोजीचे उपउपाणंत्य सामने

दिग्विजय नाईक फौंडेशन (इचलकरंजी)

वि.

महाराष्ट्र क्रीडा मंडळ (कोल्हापूर)

सकाळी ०७:३० वा.

कोल्हापूर पोलीस

वि.

मुंबई फोर्ट, मुंबई

सकाळी ०९:०० वा.

शिवतेज तरुण मंडळ

वि.

निशिकांत दादा स्पोर्ट्स फौंडेशन इस्लामपूर

दुपारी ०२:३० वा.

साई स्पोर्ट्स संभाजीनगर

वि.

एस.डी.पाटील ट्रस्ट इस्लामपूर

दुपारी ०४:०० वा.