शरद इंजिनिअरिंगमध्ये पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन

यड्राव : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमधील पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन डिन एस.व्ही. कुंभार, डॉ. बाहुबली संगमे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.ए. खोत, आयटीआयचे प्राचार्य रमेश भरमगोंडा, शरद सायन्सचे प्राचार्य एम.एम. कुंभार उपस्थित होते.
यावेळी डॉ. खोत म्हणाले, ''वाचनाने विचारांची प्रगल्भता वाढते. सर्वसमावेशक ज्ञानासाठी वाचन खूप आवश्यक आहे. आताची पिढी वाचनापासून दूर होताना दिसत असून असा प्रदर्शनातून वाचन संस्कृती वाढीस लागेल.
यावेळी ग्रंथपाल युवराज पाटील म्हणाले, पुस्तक प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबर अवांतर वाचन साहित्याचा खजिना उपलब्ध झाला आहे. या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. सर्वांना सवलतीच्या दरात पुस्तके मिळणार आहेत. तरी प्रदर्शन शनिवारी ही सर्वांसाठी खुले आहे. वाचकांनी याचा लाभ घ्यावा.
प्रदर्शनास शाळकरी विद्यार्थ्यांपासून जेष्ठांपर्यंत हजारो विद्यार्थी व रसिकांची भेट सुरू आहे. भेटीबरोबरच पुस्तकांच्या खरेदीचा ओघ कायम आहे. गेली अनेकवर्षे होत असलेल्या या प्रदर्शनाला वाचकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
या प्रदर्शनात मराठी, हिंदी, इंग्रजी, कथा, कादंबरी, चरित्रे, वाड:मय, स्पर्धा परिक्षा, एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी., अभियांत्रिकी, तांत्रिक यासह विविध विषयावरील हजारो पुस्तकांचा समावेश आहे. प्रदर्शनात बेस्ट बुक सेलर्स व मेहता बुक सेलर, कोल्हापूर यांचा समावेश आहे.
यावेळी परिक्षा नियंत्रक प्रा. मंगेश कुलकर्णी, बेस्ट बुकचे तानाजी माने, मेहता बुक सेलरचे वाहिद मणेर यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थीत होते. ग्रंथ प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी राहूल लेंजे, किशोरी गरड, राजेंद्र तेली, अजित पोवार यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.