तर मीही २०१७ मध्ये कॅबिनेट मंत्री असते - सुप्रिया सुळे यांचा टोला
लोकसभा निवडणुकांमुळे देश भरातील वातावरण चांगलाच तापलं आहे. नेत्यांच्या पक्षांतरांमुळे प्रत्येक राजकीय पक्षाचं समीकरण बिघडलं आहे . सध्या बारामतीत लोकसभेच्या रिंगणात कधी न पाहिलेली पवार विरुद्ध पवार अशी चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच सुनेत्रा पवार यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. सुप्रिया सुळे यांनी एक मीडियाच्या मुलाखतीत बारामती लोकसभा मतदारसंघामधील संघर्षाबद्दल बोलताना माझे काम चांगले आहे, मी केलेली विकासकामे माझ्या वेबसाइटवर आहेत. माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाहीये. त्यामुळे बारामतीची जनता याचा विचार करेल असे त्यांनी सांगितले.
सोबत अजित पवारांवर निशाणा साधतं ज्यांनी भाजपने काँग्रेस मुक्त भारतचा नारा दिला पण आता काँग्रेसपेक्षा जास्त काँग्रेसी भाजपामध्ये आहेत, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. २०१९ भाजपकडून ऑफर आली होती त्यामुळे विचार करायला काय हरकत होती? पण माझी विचारधारा मजबूत आहे. जर माझी विचारधारा मजबूत नसती तर २०१७ मध्येच मी कॅबिनेट मंत्री असते. तेव्हा माझ्याकडे पर्याय होता आणि अजित पवार यांच्याकडे 2019 मध्ये भाजपासोबत जाण्याचा पर्याय होता. मात्री मी संघर्षाचा मार्ग निवडलाय,असे वक्तव्य त्यांनी केलं.