HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

स्व.पी.एन.पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेतकरी संघटनेचा राहूल पाटील यांना पाठिंबा

स्व.पी.एन.पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेतकरी संघटनेचा राहूल पाटील यांना पाठिंबा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्व.आमदार पी.एन.पाटील यांनी आयुष्यभर गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रगतीसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन स्व.पी.एन.साहेबांच्या ऋणातून उतराई होऊन श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा करवीर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल पाटील यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेसचे उमेदवार राहूल पाटील आणि शिष्टमंडळाला सांगितले.

     निष्ठावंत नेतृत्व असणारे स्व.आमदार पी.एन.पाटील यांच्या कार्याची वाटचाल अखंडित राहावी यासाठी करवीर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहूल पी.पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

    स्व.आमदार पी.एन.पाटील यांनी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळेच प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त झाले.यावरून त्यांच्या मनात शेतकऱ्यांना किती महत्व होते हे दिसून आले असेही श्री.शेट्टी यांनी सांगितले.

  यावेळी राहूल पी.पाटील यांनी शेतकरी संघटनेने दिलेल्या पाठिंब्याच्या निर्णयाबाबत कृतज्ञता व्यक्त करुन स्व.आमदार पी.एन.पाटील साहेबांनी ज्याप्रमाणे शेतकरी हिताचे निर्णय घेतले, त्यांचे जीवनमान उंचावले त्याप्रमाणेच माझेही कायमपणे शेतकरी हिताला प्रथम प्राधान्य राहणार असल्याचे सांगितले.

    यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष विक्रम पाटील भूयेकर,बाळासाहेब खाडे,करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, नंदकुमार पाटील,राजू पोवार वडणगे, बाजीराव देवाळकर कोपार्डे, बाजीराव पाटील दोनवडे, कुंडलिक पाटील खुपिरे, रवी पाटील वडणगे, शंकर वरगे वडणगे, दीपक पाटील शिये आदी उपस्थित होते.

  

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.