HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

तेजस्विनी पाटील यांचा 'घर टू घर' प्रचार : निष्ठावंत स्व.पी.एन.पाटील यांचे वारसदार राहुल पाटील यांना विजयी करा

तेजस्विनी पाटील यांचा 'घर टू घर' प्रचार : निष्ठावंत स्व.पी.एन.पाटील यांचे वारसदार राहुल पाटील यांना विजयी करा

कुडित्रे (प्रतिनिधी) : स्व.आमदार पी.एन.पाटील यांनी आपले सर्वस्व पक्षाला वाहून घेतले. निष्ठावंतांचे मूर्तिमंत उदाहरणं म्हणून साहेबांचा उल्लेख होतो. आयुष्यभर जनसेवा हेच व्रत घेऊन कार्य केलेल्या स्व.पी.एन.पाटील यांचे वारसदार राहुल पाटील यांना विजयी करून विधानसभेत पाठवा. साहेबांचा समृद्ध वारसा राहुल पाटील त्याच ताकदीने पुढे नेतील, जनसेवेत ते कोठेच कमी पडणार नाहीत. करवीरमध्ये विकासकामांचा डोंगर उभारतील, असा विश्वास सौ. तेजस्विनी राहुल पाटील यांनी मतदारसंघातील युवती, महिलांशी व ग्रामस्थांशी संवाद साधताना दिला. 

महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचारानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. तेजस्विनी राहुल पाटील यांनी घर टू घर पिंजून काढत आहेत. घरोघरी जाऊन युवती, महिलांना भेटून राहुल पाटील यांच्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हात चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. 

तेजस्विनी पाटील यांनी बालिंगा, दोनवडे, वाकरे, कुडीत्रे, कोपार्डे, आडुर, कळंबे, भामटे, चिंचवडे गावात घर टू घर प्रचार करत युवती, महिलांची व ग्रामस्थांची मने जिंकली. गावागावांत युवती, महिला तेजस्विनी पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करून आम्ही राहुल पी. एन.पाटील यांनाच मत देण्याचा मनोदय व्यक्त करत आहेत.

 यावेळी माजी सरपंच जयश्री सुभाष पाटील, माजी उपसरपंच शारदा वसंत पाटील, नीता अशोक माने, नम्रता विजय पोवार, आशा अनिल माने, दया तानाजी पाटील, सूरज पाटील, माजी सभापती अविनाश पाटील, कृष्णात तोरस्कर, सागर सूर्यवंशी, सुशांत येरुडकर, प्रकाश पाटील, भगवान दत्तू पाटील यांचेसह कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.