मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे अॅक्टिव मोडवर ;मातोश्रीवर मॅरेथॉन सभा सुरू

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सावध झाले असून आत्तापासूनच पक्ष पदाधिकारी आणि संभाव्य उमेदवारांच्या बैठका सुरू आहेत.
२०१७ मध्ये बीएमसीची सत्ता काबीज करण्यात चुकलेला भाजप मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रत्येक पद्धतीचा अवलंब करू शकतो, याची उद्धव ठाकरेंना जाणीव आहे. आणि म्हणूनच महाविकास आघाडीचे नाव न घेता शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी पूर्ण ताकदिनीशी सुरू केली आहे.
कोणत्या भागातील नेत्यांची सभा कधी होणार, याचे योग्य नियोजन करण्यात आले असून, उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर मॅरेथॉन सभा सुरू केली असल्याचे पहायला मिळत आहे. शिवाय त्यांना रिपोर्ट कार्ड देण्यासही सांगण्यात आले आहे. ज्या रणनीतीमुळे भाजपला ४ जागांवरून थेट ४८ जागांवर नेले ती २०२० च्या हैदराबाद महापालिका निवडणुकीची रणनीती भाजप मुंबईतही अवलंबू शकते, असे जाणकारांचे मत आहे.२६ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान उद्धव ठाकरे मुंबईत अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. उद्धव ठाकरे स्वत: बैठकीद्वारे आढावा घेणार आहेत. महिला आघाडी आणि लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेना, युवा सेना, विद्यार्थी सेना या संलग्न संघटनांनाही सक्रिय करायचे आहे ज्याद्वारे,शिवसैनिकांचे प्रबोधन करता येईल.
उद्धव ठाकरे यांची आढावा बैठक
२६ डिसेंबर : बोरिवली विधानसभा, दहिसर विधानसभा, मागाठाणे विधानसभा, दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभा
२७ डिसेंबर : अंधेरी पूर्व-पश्चिम, विलेपार्ले, वांद्रे पूर्व-पश्चिम, चांदीवली, कुर्ला, कलिना विधानसभा
२८ डिसेंबर: मुलुंड, विक्रोळी, भांडुप, मानखुर्द - शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व -पश्चिम, अणुशक्तिनगर, चेंबूर, सायन कोळीवाडा
२९ डिसेंबर : धारावी, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा