नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ॲक्शन प्लॅन तयार करा.. मान्सून आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ॲक्शन प्लॅन तयार करा.. मान्सून आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात मान्सून आढावा बैठक पार पडली

         येत्या पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मान्सूनपूर्व कामांची आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात बैठक पार पडली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून मान्सूनपूर्व कामे मे अखेर पर्यंत पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

         जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अतिवृष्टीमुळे बाधित होणाऱ्या गावांची यादी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी "ॲक्शन प्लॅन" तयार करा. पुरामुळे जिवीत, वित्त हानी होवू नये याच नियोजन, पुरामुळे बंद रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग तयार करावेत. अपुऱ्या कामांची यादी करुन डागडुजी व दुरुस्तीची कामे मे अखेर पूर्ण करवीत. वादळ, वारा, पावसामुळे विद्युतवाहिन्या, वीजपुरवठा खंडित होवू नये यासाठी देखभाल- दुरुस्ती करावी, भूस्खलनाचा धोका असणाऱ्या गावांना भेटी देवून पाहणी करावी, सर्व नियंत्रण कक्षांचे दुरध्वनी व हेल्पलाईन क्रमांक अद्ययावत करावेत अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

         यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.