कै.रावजी महातू पाटील कुमार विद्या मंदीर कसबा ठाणे येथील शाळेत विश्वरत्न, बोधिसत्व,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कै.रावजी महातू पाटील कुमार विद्या मंदीर कसबा ठाणे येथील शाळेत  विश्वरत्न, बोधिसत्व,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली.

पन्हाळा प्रतिनिधी - आशिष पाटील

कै. रावजी महातू पाटील कुमार विद्या मंदीर कसबा ठाणे, ता -पन्हाळा, जि -कोल्हापूर शाळेत विश्वरत्न, बोधिसत्व,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय श्री. विजय संकपाळ सो होते.सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.श्री. विजय संकपाळ सो तसेच पुष्पहार शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. हरी बाजीराव पाटील सर यांच्या हस्ते घालण्यात आला.उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्प अर्पण केले. शाळेतील अध्यापक श्री. रणजित सूर्यवंशी सरांनी 'बुद्धवंदना ' घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी या कार्यक्रमांस उपस्थित होते.प्रास्ताविक श्री. हरी बाजीराव पाटील सर यांनी केले. शिक्षकांमधून श्री. संदीप कुंभार सर,श्री. सर्जेराव पाटील सर, श्री रणजीत सूर्यवंशी सर यांनी मनोगत व्यक्त केली तसेच विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट आपल्या भाषणातून उपस्थित सर्वांसमोर मांडला.अध्यक्षांच्या भाषणानंतर, उपस्थित सर्वांचे आभार श्री. संदीप कुंभार सरांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रणजित सूर्यवंशी सरांनी केले.