न्युयॉर्क शहरात झळकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो

न्युयॉर्क शहरात झळकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो
टाईम स्क्वेअरवर झळकणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील पहिले राजकारणी

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झळकले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे टाईम्स स्क्वेअरवर झळकणारे महाराष्ट्रातील पहिले नेते आहेत.  

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी 1 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. याच पक्षप्रवेशाचे फोटो टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहेत. या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल यांचे फोटो यामध्ये आहेत. युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य तसेच शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला होता.