पशुवैद्यकांच्या हक्कासाठी पट्टणकोडोलीत परिषद संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राज्यातील 1 लाख 80 हजार पदविकाधारक पशुवैद्यकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन दुग्धव्यस्थापन सेवा संघाचा राज्यस्तरीय महामेळावा कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथे आंतरराष्ट्रीय किर्तीचे डॉ. नितीन मार्कडेय यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. पशुधनपर्यवेक्षकाची 75 टक्के पदे रिक्त आहेत ही पदे तात्काळ भरण्यात यावीत अशी एकमुखी मागणी राज्यातून आलेल्या पशुवैद्यकांनी यावेळी केली.
सलग 50 वर्षांपेक्षा जास्त काळ राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर संघटनेचे नेतृत्व केलेल्या पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्धव्यवस्थापन व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नारायण जोशी यांचं नावग्रिनीज बुक मध्ये रेकॉर्ड नोंद होईल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जोशी यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त संघटनेकडून चार चाकी गाडी प्रदान कार्यक्रम यावेळी घेण्यात आला.
कार्यक्रमाला नितीन मार्कंडे, हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, राज्याचे अध्यक्ष डॉक्टर कुलकर्णी, राज्याध्यक्ष डॉक्टर सागर आरुटे, पुणे विभागीय अध्यक्ष, डॉ.सचिन मेथे, जिल्हाध्यक्ष डॉ. दिपक सोनलकर, आप्पासो पाटील, सागर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर संदीप कांबळे यांच्यासह राज्यातुन आलेले पशुवैद्यक परिषदेत उपस्थित होते.