तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निकमध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन कार्यशाळा

वारणानगर प्रतिनिधी: येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांसाठी "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. पी. आर. पाटील आणि संस्थेचे मार्गदर्शक प्रा.डॉ. पी. एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या डिजिटल युगात वाचनाची सवय कमी होत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की मोबाईल, टीव्ही, आणि सोशल मीडियाच्या आहारी जाऊन वाचनाची आवड लोप पावत आहे. त्यामुळे साहित्य, माहिती, आणि वैचारिक विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. याच कारणामुळे वाचन सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम राबवला जात आहे.
कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्यांसह सर्व शिक्षक आणि स्टाफ सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. ए. बी. माने आणि प्रथम वर्ष
अभियांत्रिकी लॅब असिस्टंट सुबोध कांबळे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
या कार्यशाळेत पॉलिटेक्निकमधील 244 विद्यार्थी सहभागी झाले होते. वारणा विविध उद्योग आणि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा आमदार डॉ. विनयरावजी कोरे, शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही.कर्जीनी यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन कार्यक्रमासाठी महत्त्वाचे ठरले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यात यश मिळाले.