पुण्यात ‘इसिस’ मध्ये तरुणांची भरती करणाऱ्या डॉक्टरला एनआयएकडून अटक

पुण्यात ‘इसिस’ मध्ये तरुणांची भरती करणाऱ्या डॉक्टरला एनआयएकडून अटक
‘इसिस’ मध्ये तरुणांची भरती करणाऱ्या आरोपीला एऩआयएकडून अटक

माझा महाराष्ट्र / प्रतिनिधी

पुण्यात इसिसमध्ये तरुणांची भरती करणाऱ्या एका डॉक्टरला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने अटक केली आहे. अदनान अली सरकार (वय, ४३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पुण्याच्या कोंढवा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी डॉक्टर हा गेली अनेक वर्षे पुण्यात राहत असून आयसिसचे मॉडेल लोकांपर्यंत पोहोचविण्याची मुख्य जबाबदारी त्याच्यावर होती. या कारवाईत इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि इसिसशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपी हा तरुणांना दहशतवादी संघटनेमध्ये समाविष्ट करून त्यांचे ब्रेन स्टॉर्मिंग करण्याचा प्रकार करत होता, अशी माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अदनान सरकार याच्यासह एनआयएने मुंबईतून तीन आणि ठाण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे.