बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात प्रवीण लोणकरला इतक्या दिवसांची पोलीस कोठडी

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात प्रवीण लोणकरला इतक्या दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई (प्रतिनिधी) : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात तिसरा आरोपी प्रवीण लोणकरला पोलिसांनी अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर "शुबू लोणकर महाराष्ट्र" या फेसबुक पेजवरून या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट व्हायरल झाली होती. पोस्टच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि अकोट येथील शुभम रामेश्वर लोणकर याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

रविवारी काय घडलं?

रविवारी पोलिसांनी शुभम लोणकरच्या अकोट येथील घरी जाऊन चौकशी केली, मात्र, घराला कुलूप असल्याचं आढळलं. शेजारी विचारपूस केल्यानंतर कळालं की दोन्ही भाऊ पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर पोलिसांनी पुण्यातील घरी छापा टाकला. या छाप्यात शुभम फरार असल्याचं लक्षात आलं आणि पोलिसांनी त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक केली.

आरोपींची भूमिका आणि तपासाची दिशा

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दोन्ही भाऊ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी होते, असा अंदाज आहे. पोलिसांनी प्रवीण लोणकरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून चौकशी सुरू केली असून, हत्येमागील कटाचा तपशील उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रवीणला पोलीस कोठडीत ठेवून, पोलिस आता शुभम लोणकर याचा शोध घेत आहेत.

या प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली यामुळे मिळालेली आहे.