भंडारा येथे दारुगोळा निर्मिती कारखान्यात स्फोट ; 5 जणांचा मृत्यू

भंडारा येथे दारुगोळा निर्मिती कारखान्यात स्फोट ;  5 जणांचा मृत्यू

भंडारा : भंडारा येथील जवाहरनगरातील दारुगोळा निर्मिती कारखान्यात आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये मोठा स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात  5 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या इमारतीमध्ये हा स्फोट झाला ती इमारत पूर्णपणे उद्धवस्थ झाली आहे. दारुगोळा निर्मिती कारखान्यातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले आहेत.

या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. स्फोट झालेल्या इमारतीमधील इतर कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. मात्र, ज्या इमारतीमध्ये हा स्फोट झाला ती पूर्णपणे उद्धवस्थ झाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती  व्यक्त केली जात आहे. या स्फोटाची माहिती मिळताच लोकांनी दारुगोळा निर्मिती कारखान्याकडे धाव घेतली.